Yek Number Review: राज ठाकरेंचा चित्रपट म्हणजे 'येक नंबर'च, कसा आहे हा चित्रपट जाणून घ्या...

Yek Number Review: राज ठाकरेंचा चित्रपट म्हणजे 'येक नंबर'च, कसा आहे हा चित्रपट जाणून घ्या...

राज ठाकरेंचा चित्रपट म्हणजे चर्चा तर होणारचं, मनसे प्रमुख राज ठाकरेंवर काढलेला 'येक नंबर' चित्रपट सध्या फार चर्चेत येताना दिसून येत आहे.
Published on
Review(3.5 / 5)

राज ठाकरेंचा चित्रपट म्हणजे चर्चा तर होणारचं, मनसे प्रमुख राज ठाकरेंवर काढलेला 'येक नंबर' चित्रपट सध्या फार चर्चेत येताना दिसून येत आहे. त्यात पण यात राज ठाकरेंबद्दल भूमिका असल्यामुळे या चित्रपटांच्या चर्चांना उधान आल्याचं पाहायला मिळालं आहे. तर या चित्रपटाला तरुण वर्गाकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रोत्साहन मिळाल्याच पाहायला मिळालं आहे. 'येक नंबर' चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

चित्रपटातले कलाकार आणि पात्र:

या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केली आहे. यामध्ये धैर्य घोलप, सायली पाटील, पुष्कर श्रोत्री, संजय मोने, अजित भुरे, वर्षा दांडले, आंनद इंगळे, राजेश खेरा हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. तसेच यात धैर्य घोलप हा मुख्य भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे आणि हिरो म्हटला की त्यात खलनायक देखील आलाच आणि या चित्रपटात खलनायकाची भूमिका राजेश खेरा याने साकारली आहे. तसेच सायली पाटील आणि तेजस्विनी पंडित थोड्या वेळासाठी दिसून येत आहेत. मात्र यात राजेश खेरा याने साकारलेली खलनायकाची भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे.

चित्रपटाची कथा:

ही कथा प्रताप नावाच्या तरुणापासून सुरु होता जो त्याच्या प्रेमापोटी मुंबईत येतो. यात तो मनसे प्रमुख आणि तरुणाईच्या मनावर ज्यांनी स्वतःचं एक मोलाचं स्थान निर्माण तयार केल आहे अशा राज ठाकरे यांच्या भेटीला तो मुंबईत येतो खरा. पण इथून त्याच्या आयुष्यातील अडचणींना सुरुवात होता. त्याच जिच्यावर प्रेम असतं त्या पिंकीला प्रभावित करण्यासाठी एक असामान्य आव्हान स्वीकारतो आणि त्यानंतरचा प्रवास प्रतापला ज्ञान देतो आणि त्याला जीवनाचा उद्देश देतो. यात त्याची भेट मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत होते की नाही, की तो त्याच्या प्रेमाला खुश करण्यासाठी राज ठाकरेंना स्वतःच्या गावात घेऊन येतो का? ते आता या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तर या चित्रपटातून राज ठाकरेंची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाचा रिव्ह्यू:

या चित्रपटाचा रिव्ह्यू 3.5 इतका आहे. तर या चित्रपटाने पहिल्या दिवशी १७ लाखांची कमाई केली होती. यानंतर दुसऱ्या ते चौथ्या दिवसांपर्यंत या चित्रपटाने १७ लाखांची कमाई केली आहे. तर आता अखेर ७२ लाखांवर येऊन ठेपला आहे. या चित्रपटाने एकूण ७२ लाखांची कमाी केली आहे. येक नंबर हा एक विनोदी आणि कौटुंबिक चित्रपट असून त्यामध्ये एज-ऑफ-द-सीट थ्रिलर मनोरंजन असेल. या चित्रपटात नकारात्म भाग अद्याप ही समोर आलेला नसून तुम्ही जर राज ठाकरेंच्या विचारांचे समर्थन करत असाल तर तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल तसेच एक प्रेक्षक म्हणून देखील हा चित्रपट पाहाण्यासारखा आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com